Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

team by team
June 12, 2023
in राज्य
0
‘ज्ञानोबा माऊली’च्या जयघोषात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

पुणे  l

 

 

‘टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा, मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा… टाळ-मृदंगाच्या तालावर भजनात दंग वारकऱ्यांची पाऊले….  ‘ज्ञानोबा माऊली’, ‘माऊली, माऊली’ चा गजर…. डोक्यावर तुळशी वृंदावन, हाती दिंड्या-पताका …अशा भक्तिमय वातावरणात आळंदी येथून आषाढी वारीसाठी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले.

आळंदी येथील समाधी मंदिरात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीकांत भारतीय, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, गुरु हैबतबाबा यांचे वंशज बाळासाहेब पवार – आरफळकर आदी उपस्थित होते.

मानाच्या पालखी प्रदक्षिणेनंतर आळंदी संस्थान येथील गांधीवाडा देवस्थानाकडे पालखी सोहळ्याचे मुक्कामासाठी प्रस्थान झाले. प्रस्थान सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.

 

वारकऱ्यांसाठी सुविधा

आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन, मंदीर संस्थान, पुणे व पिंपरी-चिंचवड मनपाने तयारी केली आहे. आळंदीत पाण्याची सोय, विजेची सोय, वैद्यकीय पथके, पालखी मार्गाचे वेळापत्रक, मंदिराच्या प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्रणा, सुलभ शौचालय, पोलीस मदत केंद्र, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, नदी पात्रात बोटीची व्यवस्था, सूचना फलक अशी व्यवस्था करण्यात आली असून जागोजागी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच ध्वनीक्षेपणाद्वारे  सूचनाही देण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी विकास विभागाने दिली उभारी ; उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी प्रशिक्षणाची शिदोरी

Next Post

चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा

Next Post
चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा

चला समजून घेऊया सर्वंकष ग्रामविकास आराखडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add