नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील सुनील रामोशी यांना दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे
राजरत्न साहेब यांच्या हस्ते नाशिक येथे दि. 18 सप्टेंबर रोजी सन्मानपत्र देऊन सुनील रामोशी यांना नंदुरबार जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारत समाजाचे काहीतरी देणे लागते या अनुषंगाने आपण बौद्ध समाजासाठी दिवस-रात्र एक करून भारतातील किंवा परदेशातील बौद्ध बांधवांची जनगणना व बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा निर्धार केला आहे. राजरत्न साहेब यांनी दिलेल्या जबाबदारीचे मी तंतोतंत पालन करेल व समाजाच्या हिताचे काम करेल असे सुनील रामोशी यांनी सांगितले.