नंदूरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २४ वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सुचनेनुसार जिल्हा नियोजित कार्यालय येथे ध्वजारोहन जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
यानंतर त्यानंतर महाराष्ट्रातील समाजसुधारक महापुरुषांचे प्रतिमा पुजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समतावादी दृष्टीकोन आणि भारतीय संविधानावर असलेली अढळ निष्ठा या जोरावर पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे.
मातीशी नाळ जोडलेला पक्ष ही आपली ओळख आहे.गेल्या दोन दशकांहून अधिक काळ आपला पक्ष लोकशाही टिकविण्यासाठी झटतो आहे.आव्हान कठीण असले तरीही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जनसामान्यांचा आवाज म्हणून पक्ष नेहमीच कार्यरत राहील अशी खात्री आहे,नंदुरबार जिल्हा निर्मिती असो जिल्हा विकासासाठी शरद पवार यांनी मोठे योगदान दिले आहे,जिल्ह्याचा विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिंहांचा वाटा आहे.
यापुढे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यातील तळागाळातील लोकांन सोबत राहील अशी ग्वाही दिली. त्यापुर्वी जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,पंचायत समिती सदस्य राजेंद्र बाविस्कर,शहराध्यक्ष मोहन माळी,डॉक्टर सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जितेंद्र भंडारी यांनी ही मार्गदर्शक केले याप्रंसगी लोकप्रतिनिधी,जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य, विविध सेल आघाडी,फ्रंटल, जिल्हाध्यक्ष,सरपंच उपसरपंच सदस्य,आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते महिला तरुण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








