नंदूरबार l प्रतिनिधी
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अ-विभाग नंदुरबार यांच्या पथकाने नवापूर- चरणमाळ रस्त्यानजीक उसाच्या शेतात रायपूर शिवार ता. नवापूर येथे अवैधपणे परराज्यातील मदयाची वाहतुक करतांना आयशर वाहनासह ३० लाख ६६ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दि. १० जुन रोजी डॉ. विजय सुर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, सुनिल चव्हाण संचालक (अं व द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, डॉ. बी. एच.तडवी विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक, तसेच सौ. स्नेहा सराफ , अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली
मिळालेल्या गुप्त बातमीनुसार नवापूर चरणमाळ रस्त्यानजीक उसाच्या शेतामध्ये ता. नवापूर जि. नंदुरबार येथे टाटा कंपनीची आयशर सहाचाकी वाहन ( क्र. MH-१८-AA-७९६) सदर वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये रॉयल स्पेशल प्रिमीअम व्हिस्की १८० मि.ली. क्षमतेच्या ११६ बॉक्स (दिव व दमण राज्यात विक्रीकरीता असलेले), इंमपेरील ब्लु व्हिस्की १८० मि.ली. ९० बॉक्स (दिव व दमण राज्यात विक्रीकरीता असलेले), ऑल सिजन व्हिस्की ७५० मि.ली. २९ बॉक्स, हायवर्ड ५००० बियर ५०० मि.ली. ८० बॉक्स, मॅजिक मुमेंट व्होडका ७५० मि.ल, श्री. २३ बॉक्स, रॉयल चॅलेज व्हिस्की ७५० मि.ली. १७ बॉक्स असे एकुण ३५५ बॉक्स मिळुन आले. तेथे वाहनासह धनराज कौतिक पाटील, वर्षे रा. उभंड, ता. साक्री, जि.धुळे, भिबीसन रामलाल सोनवणे, रा. कावठी पो. मेहरगाव ता. साक्री, जि. धुळे या संशयित आरोपींना अटक करण्यात आली असुन आयशर वाहनासह एकुण ३० लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर गुन्हयात भाविन रमेश कोकणी, रा. रायपूर, ता. नवापूर, किरण मनीलाल चौधरी, रा. बोरचडी बठी फलीयु, व्यारा, मुन्नो उर्फ मुकेश अश्वीन गावित, रा. टीचकपुरा ता. जि. व्यारा पुनाभाई भटाभाई भरवाड रा. जमादार फलीया, सोनगड फरार आहे. सदर कारवाई महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत कलम ६५(अ) (ई), ८०,८१,८३,९८(२), १०८ अन्वये करण्यात आली.
सदरची कार्यवाही प्रशांत एस पाटील, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ-विभाग नंदुरबार, एस. आर. नजन, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक नंदुरबार, जवान सर्वश्री हंसराज चौधरी, भुषण चौधरी, अजय रायते, सहा. दु. निरीक्षक मोहन पवार, पो.ह. दिनेश वसुल नवापूर पो.स्टे, पो. कॉ. आबा खैरनार नवापूर पो. स्टे यांनी पार पाडली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्री. प्रशांत एस पाटील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अ-विभाग नंदुरबार हे करीत आहेत.








