नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यात मातोश्री बहुउद्देशीय संस्था लहान शहादा बोरपाडा ता. नवापूर यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन व भूमिपूजन नियोजन कार्यक्रम दि. १५ जून २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपाली चाकणकर व माजी मंत्री जलसंपदा महाराष्ट्र राज्य जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
यात दि. १५ जून २०२३ रोजी सकाळी ९ ते ९:३० या दरम्यान बोरपाडा येथे वृद्धाश्रम व महिला आश्रम उद्घाटन त्यानंतर सकाळी ९:३० वाजता बोरपाडा येथुन डोकारे येथे रवाना.त्यानंतर सकाळी १०:१५ ते १०:४५ डोकारे येथे महिला कारखाना जागेचे भुमिपुजन त्या नंतर सकाळी ११:३० वाजता नवापूर शहरातील लीलावती मॉल येथे आदिवासी अर्बन निधी लिमिटेड बँकेचे उद्घाटन दुपारी १२ ते १२:३० दरम्यान नवापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान येथे १ हजार महिलांना साडी वाटप,
पूर्णागिरी सत्कार व पोलीस पाटील व सरपंच उपसरपंच यांची समाज उपयोगी बैठक असा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक, नंदुरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, माजी आमदार शरद गावित,शहादाचे माजी आमदार उदेसिंग पाडवी,माजी जि.प अध्यक्षा रजनी नाईक, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित,संगीता गावित, राष्ट्रवादी महिला आघाडी नंदुरबार निरिक्षक मिनाक्षी चव्हाण,तहसीलदार मंदार कुलकर्णी,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी स्वप्निल मुदलवाडकर,गटविकास अधिकारी मानसिंग वळवी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे आदी मान्यवर कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम मातोश्री बहुउद्देशीय संस्था लहान शहादा बोरपाडा ता नवापूर यांनी आयोजित केलेला आहे.
मातोश्री बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष दिपांजली गावित, उपाध्यक्ष शिवयज्ञ गौंड,सचिव रामयज्ञ गौड, कार्याध्यक्ष सुरेश गिरी ,मार्गदर्शक म्हणून दिवानजी गावित ,सल्लागार शीला गावित यांनी या कार्यक्रमात बहुसंख्य ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.