तळोदा l प्रतिनिधी
परिवर्तन युवा मंच, तळोदा कडून पोलीस निरीक्षक,तळोदा मार्फत गृह मंत्रालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना दलित हत्याकांड विषयी निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात दिवसेंदिवस दलितांवर राजरोसपणे हल्ले सुरू आहेत. शाहू,फुले,आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहेत. नांदेड जिल्ह्यातील बोंडार येथील अक्षय भालेराव या तरुणाचे जातीय मानसिकतेतून निर्गुण हत्या करण्यात आली तसेच लातूरच्या रेनापुर मध्ये राहणाऱ्या गिरिधारी तपघाले यास सावकाराने लाकडी दांडक्याने मारहाण करून हत्या केली. या घटनांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उठली आहे. जातीय मानसिकता व दलितांवरील अन्य अत्याचाराच्या कायमचा बंदोबस्त होण्यासाठी बोंडार येथील अक्षय भालेराव व लातूर रेनापुर येथील गिरिधारी तपघाले यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व मयताच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयाचे शासनाकडून तात्काळ मदत मिळावी.
या मागणीसह परिवर्तन युवा मंच तळोदा कडून जाहिर निषेध नोंदविण्यात आला.निवेदन देतेवेळी परिवर्तन युवा मंचचे नितीन गरुड, सिध्दार्थ नरभवर, आदिवासी युवा शक्ती जिल्हाध्यक्ष विनोद माळी, टायगर ग्रुप शहराध्यक्ष शुभम खाटीक, परिवर्तन युवा मंच सदस्य अविनाश सुरवाडे, संघप्रिय नरभवर, अमोल वळवी, योगेश धानका,रितेश नरभवर,देवेंद्र शिंदे,ऋषी पाडवी,साहील नरभवर, धीरज पाडवी आदी उपस्थित होते.








