नंदूरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यात ४ लाख बीटी कापसाची पाकीट उपलब्ध असून जादा दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाईचा ईशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तानाजी खर्डे यांनी बैठकीत दिला.
जिल्ह्यातील सर्व कापूस बियाणे पुरवठादार कंपनी प्रतिनिधींची जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तानाजी खर्डे यांनी बैठक बोलावून माहीती घेतली उपस्थित कंपनी प्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या माहीतीनूसार जिल्ह्यात सुमारे 4 लाख 11 हजार बी.टी. कापूस बियाणे पाकिटे उपलब्ध झालेली आहेत. तसेच मागणीनूसार टप्प्याटप्याने बियाणे पुरवठा होणार असल्याचे कंपनी प्रतिनिधी यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी कुठल्याही विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता उपलब्ध बियाण्यामधून आपल्या पसंतीचे बियाणे घ्यावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तानाजी खर्डे व कृषि विकास अधिकारी प्रकाश खरमाळे यांनी केले. तसेच कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर बियाणे कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही सांगितले.
विभागीय कृषि सहसंचालक नाशिक मोहन वाघ यांनी अनधिकृत बियाणे विक्री करण्या यावर बियाणे कायद्यानुसार कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कृषि विकास अधिकारी यांनी पूरवठादार कंपन्यांनी पूरवठा करण्यात आलेल्या बियाण्याची डिलरनिहाय माहीती कृषि विभागास देण्याच्या सूचना दिल्या. जादा दराने विक्री करणाऱ्या कृषि सेवा केंद्रांवर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले. तसेच शेतकरी बांधवांनी छापील किमतीपेक्षा जास्त दराने बियाणे खरेदी करू नये. तसेच असे गैरप्रकार कूठेही निदर्शनास आल्यास त्वरीत कृषि विभागास कळवावे जेणेकरून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात आले. सदर बैठकिस ई.बी.कदम, एम. जी. विसपूते, वाय. एस. हिवराळे तसेच बियाणे पुरवठादार कंपनी प्रतिनिधी व प्रमुख विक्रेते उपस्थित होते.









