नंदूरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीचा निकाल ९६.७२ लागला आहे.
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील का वि प्र संस्थेच्या श्रीमती क पू पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीत एकूण ६२विद्यार्थी प्रविष्ट होते पैकी एक विद्यार्थी गैरहजर व दोन विद्यार्थी एटीकेटी श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
यात प्रथम पियुष आनंदा पाटील ९२.४० टक्के,जान्हवी नवल पाटील ८९.२० टक्के हर्षदा गव्हरलाल पाटील ८७ टक्के, नंदिनी शेखर लांडगे ८६.६६ टक्के, महेश प्रेमराज पाटील, ८३.४४ टक्के साक्षी गणेश माळी ८२.६० टक्के, वर्षा राजू पाटील ८२.४० टक्के मिळाले या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष विजयराव पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, संस्थेचे सचिव सर्व संचालक मंडळ, प्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.