नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा-तळोदा रस्त्यावरील ठेगचे गावाजवळ पोलिसांनी एका वाहनासह दोन लाख ८२ हजार ४८० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा-तळोदा रस्त्यावरील ठेगचे गावाजवळ सागर मोहनदास जमनानी व त्याच्या एका साथीदारदारा सोबत टाटाचे ( एम.एच 39, ए.डी. 1960) या वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधीत व खाण्यास
अपायकारक गूटखा पदार्थाची वाहतूक करीत असताना पोलिसांना आढळून आला.पोलिसांनी दोन लाखांच्या वाहनासह २ लाख ४५ हजर ४३२ रुपये किमतीचे १ हजार २८४ विमल पानमसाला चे पाऊच ३७. हजार ४८ रुपये किमतीचा असा एकूण ४ लाख ८२ हजर ४८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोशि दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून सागर मोहनदास जमनानी, विशाल मोहनदास जमनानी दोन्ही रा.जुनी सिंधी कॉलनी यांच्या विरुद्ध भादवि कलम १८८, २७२,२७३ सुरक्षा मानके ३२८सह अन्न अधि. २००६ चे २६ (२) (४) ३० (२) (ए) प्रमाणे गून्हा दाखल करण्यात आला असून.याप्रकरणी पुढील तपास पोउनि छगन चव्हाण करीत आहेत.