नंदुरबार ।
तालुक्यातील विखरण ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बाल विकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करित असलेल्या महिलांना प्रोत्साहन मिळावे याकरिता अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच निर्मला रोहिदास मराठे यांच्या हस्ते अल्काबाई सदु भिल यांचा सन्मान करण्यात आला तर श्रीमती अनिता रविंद्र पाटील यांना पोलिस पाटील दिपमाला पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र चिन्ह, शाल , श्रीफळ , रोख ५०० रुपये महिलांना देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच सुनिता पवार.व ग्रा.पं. सदस्य, ग्रामसेवक गायकवाड आदी उपस्थित होते.