नंदूरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास विभागाचे माजी मंत्री तथा आमदार ॲड. के.सी. पाडवी यांच्या मातोश्री सोमीबाई चांद्या पाडवी यांचे अल्पशा आजाराने आज निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा अक्राणी तालुक्यातील असली येथील त्यांच्या राहत्या घरापासून दि. 31 मे रोजी दुपारी दोन वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.