चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी तळोदा तालुका व शहर आढावा बैठक तसेच सेल जिल्हाध्यक्ष यांची आढावा बैठक जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोदा येथे दि.२३ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.
राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तळोदा येथे तालुका व शहर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा निरीक्षक व जिल्हाध्यक्ष यांनी शहराध्यक्ष व तालुकाध्यक्ष यांचाकडून आढावा घेतला व शहरात तसेच तालुक्यातील पक्षाची स्थितीची माहिती घेतली.
तसेच सहकार सेल जिल्हाध्यक्ष यांचाही आढावा घेतला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रामराव आघाडे, सहकार सेल जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चव्हाण, तालुका अध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपूत, जेष्ठ कार्यकर्ते केसरसिंग क्षत्रिय, शहराध्यक्ष योगेश मराठे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, संचालक कृ.उ.बा.समिती तळोदा भरत चौधरी, युवा कार्यकर्ता संदीप परदेशी, माजी नगरसेवक गणेश पाडवी, भट्या पाडवी, महेंद्र पोटे, राहुल पाडवी, गणेश राणे, अनिल पवार, नदीम बागवान, धर्मराज पवार, संदीप वळवी, अरविंद वळवी, आकाश पाडवी, मंनु पाडवी, ॲड. गणपत पाडवी, अक्षय वळवी, अमन नवले, अंबालाल नवले, गणेश गिरासे, विजय कढरे, मुकेश पाडवी, सुदाम मोरे, सोमनाथ चित्ते, संजय वळवी आदी उपस्थित होते.