नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकार्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची भेट घेतली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा जाणून घेत नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांची देखील माहिती घेऊन पक्ष कार्याचे संघटन वाढविण्यावर भर देण्याविषयी खा.शरद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांची सदिच्छा भेट नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा पदाधिकार्यांनी घेतली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरदचंद्र पवार यांना आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे प्रतीक असलेले धनुष्यबाण देऊन सन्मानित केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन पवार, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष दानिश पठाण, जि.प. सदस्य मोहन शेवाळे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संजय खंदारे, शहादा तालुका अध्यक्ष चिंतामण पाटील, शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुवर, नंदुरबार तालुकाध्यक्ष मधुकर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते माधव पाटील, शहादा तालुकाध्यक्ष डॉ. जितेंद्र भंडारी, रवींद्र वळवी, ओबीसी सेलचे नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी खा. शरदचंद्र पवार यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने नंदुरबार जिल्ह्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुका संदर्भातील व्युव्हरचना जाणून घेतले. या निवडणुकांसाठी आतापासूनच कामाला लागून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यास भर द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी निवडणुकांसाठी इच्छुकांची मते देखील जाणुन घेण्यात आली.