नंदूरबार l प्रतिनिधी
घराजवळील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेवून एका 15 वर्षीय अल्पवयीन युवतीने आत्महत्या केल्याची घटना मोलगीचा ओलीदोपाडा येथे घडली. या युवतीच्या मृत्यूचे कारण समजू शकले नसून मोलगी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील मोलगीचा ओलीदोपाडा येथील 15 वर्षीय युवतीने इयत्ता नववीचे शिक्षण घेतले. सदर युवतीने दि. 21 ते 22 मे दरम्यान घराजवळील 200 मिटर अंतरावर असलेल्या आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेतला.
अल्पवयीन युवतीने गळफास घेत आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलेले नाही. याबाबत युवतीच्या आईने मोलगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोना. चेतन साळवे हे करीत आहेत.








