नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील कोळदा येथील शेतकऱ्याच्या मुलगा प्रशांत गजानन राजपुत याने नुकताच लागलेल्या upsc च्या निकालात 97 वा रँक मिळविला आहे.त्यामुळे त्याचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की.नंदूरबार तालुक्यातील कोळदा येथील शेतकरी गजानन राजपुत हे शेती सोबतच दुधाचा व्यवसाय करीत होते.दोन वर्षापूर्वी त्यांनी दुधाचा व्यवसाय बंद केला.
त्याचा मुलगा प्रशांत गजानन राजपुत याचे प्राथमिक शिक्षण कोळदा गावातच झाले.त्यानंतर त्याने नंदूरबार येथील एकलव्य विद्यालयात 12 पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.अभ्यासात सातत्य ठेवत चिकाटीने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. प्रशांत गजानन राजपुत याने नुकताच लागलेल्या upsc च्या निकालात 97 वा रँक मिळविला आहे.
त्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाने जिल्हाधिकाऱ्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.निकालाची माहिती मिळताच नातेवाईक मित्र परिवाराने शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती.