नंदुरबार l
तालुक्यातील साडेसाती मुक्तीपीठ शनिमांडळ ते समाधी स्थळ निरसपूर (खेतिया) येथे श्री.श्री.रामानंदपूरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिंडी यात्रा काढण्यात आली. दिंडीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
दि.22 रोजी शनिमांडळ येथून सकाळी 6.30 वाजता काढण्यात आली. गावातून दिंडी काढून गल्लो गल्लीतून दिंडीचे विधीवत पूजन करण्यात आले.श्री. श्री.महामंडलेश्वरस्वामी रामानंदपूरी यांच्या पुण्यतिथी निमित्त शनिमांडळ येथून दिंडी काढण्यात आली आहे. ही दिंडी दि.24 मे रोजी निरसपुर (खेतिया) येथे श्री श्री महामंडलेश्वर स्वामी रामनंदपूरी पादुका पुजनासह आरती यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. हरे राम, हरे कृष्णचा गजर करीत दिंडी खेतियाकडे रवाना झाली आहे.








