Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

team by team
May 23, 2023
in राजकीय
0
भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे निषेध आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात येथील शहर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे तीव्र निषेध नोंदविण्यात आला. यावेळी ईडी.. भाजपाचा घरगडी, वॉशिंग पावडर ईडी… वॉशिंग पावडर ईडी, भाजपाचा हवालदार काय करतो… ईडीच्या नोटीसा वाटत फिरतो, पन्नास खोके… ईडी पण ओके, भाजपा हमसे डरती है… ईडी को आगे करती है, ईडी सरकार हाय.. हाय, भाजपा हटाव…लोकशाही बचाव, भाजपा प्रवेश ऑफिस.. ईडीचे ऑफिस अशा विविध घोषणा देत भाजपा सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी यु वक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राऊ मोरे तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे शहरातील नेहरु पुतळा परिसरात शहर पोलीस स्टेशन समोर भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी डॉ.अभिजीत मोरे यांनी सांगितले की, ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्रास देण्याचा, त्यांची नाहक बदनामी करण्याचा जो प्रकार भाजप सरकारने चालवला आहे, त्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यात आणि तालुक्यात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे भाजपच्या हुकूमशाही पद्धती विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
याआधी असेच प्रकार अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासोबत देखील भाजपने केला आहे. कथित आरोपावरून या नेत्यांना तुरुंगात टाकण्याचे कटकारस्थान हे भाजपनेच केले आहेत. जे लोक भाजपामध्ये जातात त्यांच्याकडे ईडी दुर्लक्ष करते आणि जे लोक भाजप विरोधात लढतात त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रकार मागील काही वर्षापासून सुरु आहे. भाजपच्या या दुटप्पी आणि कुटील धोरणांच्या विरोधात आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे आपला आवाज बुलंद करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जि.प.सदस्य मोहन शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, शहादा पं.स.सदस्य राजेंद्र बाविस्कर, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष बबलू कदमबांडे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुबार शहराध्यक्ष लल्ला मराठे, कालू पहेलवान, जितु ठाकरे, राजु शिंदे, जयंत मोरे, लाला बागवान, राजा ठाकरे, अदनान मेमन, राहुल जगदेव, बापू महाले, रविंद्र जावरे, निलेश चौधरी, गोविंद शेवाळे, अनमोल पाडवी, अमीन खाटीक, पवन चव्हाण, समीर शेख, अमन पाडवी, मुकेश ठाकरे, जय ठाकरे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी भागात आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणार : आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

Next Post

क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Next Post
क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

क्षत्रिय राजपूत सेवा समिती व क्षत्रिय राजपूत समाजाच्या वतीने वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

ठाणेपाड्यात कोकणी समाजाचा घट्या देव उत्सव उत्साहात

October 19, 2026
कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

कोपर्ली येथे प्रेरणा दिन उत्साहात

October 18, 2026
माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे  हात धुवा दिवस उत्साहात

माध्यमिक विद्यालय खोकराळे येथे हात धुवा दिवस उत्साहात

October 18, 2026
नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

नांदरखे येथे स्व.विद्याताई पाटील यांना अभिवादन

October 18, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 18, 2026
तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

तर राष्ट्रीय महामार्गांची कामे थांबवण्यात येतील :आ.चंद्रकांत रघुवंशी

October 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add