नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील बालवीर चौक, नवाभोईवाडा परिसरातील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिराचा आज जिर्णोद्धार सोहळा होत आहे. यानिमित्त सकाळी मिरवणूक, दुपारी मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि सायंकाळी महाप्रसाद (भंडाऱ्याचे) आयोजन करण्यात आले आहे.
बालवीर चौकातील आतल्या बोळीत सुमारे 55 वर्षांपूर्वी पिंपळाच्या झाडाखाली स्वयंभू हनुमानजी मूर्ती प्रकट झाली होती. याच ठिकाणी नव्याने श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर उभारण्यात आले. या मंदिरात शिवलिंग, नंदी, हनुमान आणि गणपती मूर्ती स्थापित करण्यात येणार आहे.पुरोहितांच्या उपस्थितीत विधीवतपणे मूर्ती प्रतिष्ठापना होईल.
सोमवार दि. 22 मे रोजी सकाळी सात वाजता कलशधारी कुमारीका आणि सुवासिनी महिलांच्या उपस्थितीत वाजत गाजत बैलगाडीवरून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.मोठा मारुती मंदिरापासून कुंभारवाडा, गवळीवाडा, नवा भोईवाडा मार्गे मूर्तींची मिरवणूक बालवीर चौकात पोहोचेल.सकाळी 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत पुरोहितांच्या साक्षीने जोडप्यांच्या उपस्थितीत विधीवतपणे पूजन होईल. सायंकाळी सूर्यास्तानंतर मान्यवरांच्या हस्ते महाआरती होईल.त्यानंतर महाप्रसाद (भंडारा) वाटपाने सोहळ्याचा समारोप होईल.भाविकांनी महादेव दर्शन आणि महाप्रसादाचाा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीपिंपळेश्वर महादेव, हनुमान,गणेश मंदिर समितीने केले आहे.