नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील भरडू गावात तलवार बाळगल्याने एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवापूर तालुक्यातील भरडू गावात शिंगा गोबजी वळवी याने त्याच्या ताब्यात एक लोखंडी तलवार बाळगून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने आढळून आला. याबाबत पोशि.विश्वनाथ नाईक यांच्या फिर्यादीवरुन विसरवाडी पोलिस ठाण्यात शिंगा वळवी याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.किरण वळवी करीत आहेत.








