नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील रापापूर येथे दूपारी आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या वादळ व अवकाळी पावसामुळे सुमारे २० च्या वर घरांची छपरांची पडझड झाली असुन शेत मालाचे मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.

नंदूरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून तापमानाचा पारा ४५ च्या जवळ पोहचला आहे.असे असताना आज दि २० रोजी रापापूर ता. तळोदा येथे दूपारी तीन वाजेच्या सुमारास अचानक मोठे वादळ सूरू झाले.त्यानंतर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला.यावेळी हवेचा जोर इतका होता की, सुमारे २० च्या वर घरांची छपरे, पत्रे उडून गेल्याचे सांगण्यात येत आहे.अंगणात उभ्या केलेल्या मोटरसायकली हवेत या अंगणातून त्या अंगणात उडून गेले .
एका शेतकऱ्याचे बैल पत्र्याच्या शेडमध्ये होते.ते शेड बैलांच्या अंगावर कोसळले गावकऱ्यांचा मदतीने बैलांची सूटका करण्यात आली.अनेकांचे छप्पर उडाल्याने घरातील शेतमाल,घर संसाराचा वस्तू भिजून नूकसान झाले आहे.प्रशासनाने पंचनामा करावा अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत ठाकरे यांनी केली आहे.अद्याप पंचनामा झाला नसल्याने नुकसानीचा अंदाज लावणे कठीण आहे.








