नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा मराठा क्रांती मोर्चाचे धडाडीचे युवा नेतृत्व नितीन रोहिदास जगताप यांची नंदुरबार जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नंदुरबार जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नंदुरबार शहरातील सामाजिक कार्यकर्ते नितीन रोहिदास जगताप यांची नियुक्ती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक निंबा मराठे व वीरेंद्र मोरे तसेच धुळे जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव यांनी नियुक्तीपत्र देऊन केली आहे.नियुक्ती पत्रात नमूद केल्यानुसार मराठा समाजाच्या हक्कासाठी व मराठा समाजाच्या आरक्षणाकरिता नंदुरबार जिल्ह्यात भरीव असे आत्तापर्यंत नितीन जगताप यांनी मोठे योगदान दिलेले असून, त्यांचे हे कार्य व नंदुरबार जिल्ह्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी या पत्राद्वारे पुढील दोन वर्षासाठी नियुक्ती करण्यात येत असल्याचे नमूद केले असून,
याच्या माध्यमातून मराठी समाजाच्या हितासाठी अशीच भरभराटीची व समाज विकसित कामे मराठी क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जिल्ह्यात जोमाने करून, समाजाचे मोठ्या प्रमाणावर संघटन करून, समाजात नवचैतन्य निर्माण होईल अशा आशयाचे नियुक्तीपत्र, नितीन जगताप यांना देण्यात आले आहे, यावेळी धुळे जिल्हा मराठी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, कार्याध्यक्ष संदीप पाटोळे, सचिव सचिन जाधव, जिल्हा संघटक हेमंत मराठे, जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ढवळे, दिग्विजय गायकवाड, ॲड. दिनेश काळे, कैलास मराठे, जिल्हा संघटक श्याम निरगुडे, ऋषिकेश पाटील, सहसचिव देवेंद्र पाटील, संदीप सूर्यवंशी, वीरेंद्र मोरे, दीपक रौंदळ, राजू मराठे, भानुदास बगदे, रंजीतराजे भोसले, प्रमोद साळुंखे, उल्हास यादव, राजेंद्र ढवळे, गोविंद वाघ, विनोद जगताप, नंदूरबार येथील पंकज मराठे व आनंद मराठे आदी यावेळी उपस्थित होते.








