Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, वारसांना आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेश वितरीत

team by team
May 19, 2023
in राजकीय
0
बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार, वारसांना आ.आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाखांचा धनादेश वितरीत
अक्कलकुवा l प्रतिनिधी
       बिबट्याने हल्ला करुन ठार केलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील देवमोगरा पुनर्वसन येथील सुरेश भाईदास वसावे या बालकाच्या वारसांना वन विभागाच्या वतीने विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
       नुकतंच देवमोगरा पुनर्वसनच्या शेत शिवारात शेताच्या घराच्या अंगणात खेळत असतांना अचानकपणे बिबट्याने हल्ला करुन सुरेश भाईदास वसावे या बालकाला बिबट्याने फरपटत नेत त्याच्या शरीराचे लचके तोडून त्याला जागीच ठार केले होते. घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी घटनास्थळीत धाव घेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करुन परिसरातील शेतात मृत बालकाचा शोध घेतला होता त्यानंतर स्वतः ग्रामीण रुग्णालयात जात बालकाचे शवविच्छेदन करुन अधिकाऱ्यांना अहवाल शासनास पाठविण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान बालकाच्या वारसांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार आमश्या पाडवी यांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला त्यामुळे वन विभागाच्या वतीने सुरेश वसावे या बालकाच्या वारसांना वन विभागाने तात्काळ वीस लाख रुपये भरपाई म्हणून मंजूर केले आहेत. त्यानुसार देव मोगरा पुनर्वसन येथील ग्रामपंचायत कार्यालयात आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश बालकाच्या वारसांना देण्यात आला. यावेळी सुरेश वसावेचे वडील भाईदास न्हाल्या वसावे व आई नोवीबाई भाईदास वसावे यांनी दहा लाख रुपयांचा धनादेश स्वीकारला.
याप्रसंगी तळोदा व विभागाचे उपवनसंरक्षक एल एम पाटील अक्कलकुव्याचे वनक्षेत्रपाल ललित गवळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काना नाईक, देव मोगरा पुनर्वसन येथील सिंमजी नाईक जयंती पाडवी आदी उपस्थित होते यावेळी आमदार आमश्या पाडवी उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील, यांनी ग्रामस्थांना वन्य हिंस्त्र प्राण्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत मार्गदर्शन करत शेतकऱ्यांनी आपल्या शेत शिवारात जाताना एकटे जाऊ नये, जाताना सोबत कोणाला तरी न्यावे व जोर जोरात आवाज करत रस्त्याने जावे तसेच सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामस्थांनी घराच्या अंगणात किंवा शेत शिवारात बाहेर झोपू नये असे आवाहन केले शेतकऱ्यांनी स्वतः सोबत आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन ही त्यांनी केले.
      बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या सुरेश वसावे या बालकाच्या कुटुंबीयांना एकूण 20 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी आज आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. तर उर्वरित दहा लाखांपैकी पाच लाख रुपये हे पाच वर्षासाठी मुदत ठेव योजनेत तर उर्वरित पाच लाख रुपये हे दहा वर्षाच्या मुदत ठेवीत ठेवण्यात येणार आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

भगवान शंकराच्या पिंडीला हिरवी चादर चढविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कडक कारवाई करा: हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

Next Post

गंभीर बाब :गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती

Next Post
गंभीर बाब :गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती

गंभीर बाब :गर्भवती महिलेस रुग्णवाहिकेतच झाली प्रसूती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add