नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील नामनिर्देशनपत्र प्राप्त न झालेल्या व बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित ग्रामपंचायतींची मतमोजणी संबंधित तहसिल कार्यालयांत 19 मे रोजी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यातील 84 ग्रामपंचायती मधील 111 सदस्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे, त्यापैकी बिनविरोध झालेल्या 52 जागा व नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित अक्राणी तालुक्यातील 1 , तळोदा तालुक्यातील 5, शहादा तालुक्यातील 12, नंदुरबार तालुक्यातील 6 व नवापूर तालुक्यातील 4 अशा 28 ग्रामपंचायती मधील 34 रिक्त सदस्य पदांच्या निवडणूकीसाठी गुरुवार, 18 मे 2023 रोजी मतदान होणार असून शुक्रवार 19 मे 2023 रोजी तहसिलदार कार्यालय, अक्राणी, तहसिल कार्यालय, तळोदा, तहसिल कार्यालय, शहादा, तहसिल कार्यालय, नंदुरबार व तहसिल कार्यालय, नवापूर येथे सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी होणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी कळविले आहे.