नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकरदे येथे ग्रामपंचायत काकरदे व्दारा बुद्ध पौर्णिमा निमित्ताने तसेच लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त नागरिकांनव्दारे शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून राजर्षीना आगळे वेगळे अभिवादन करण्यात आले .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेळु सुतार (खैरनार) ,हे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच पुंडलिक भापकर, किरण मराठे उपसरपंच, विठोबा माळी, तुकाराम माळी, कृष्णा पाटील, सुरेश मराठे, रविंद्र मराठे, सुभाष हिरे, ज्ञानेश्वर बागुल, भटु शिंदे, शांतीलाल माळी, गणेश खलाने, दगडु पवार, सुभाष जगदेव, सुनिल पवार, कृष्णा माळी, मुकेश माळी, हर्षल माळी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रविण पवार यांनी केले तसेच आभार प्रदर्शन शालिग्राम ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त ग्रामस्थांनी महापुरुषांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक समता निर्मिती साठी कार्य करण्याची या वेळी शपथ घेतली. या वेळी सारा परिसर राजर्षी शाहू छत्रपती च्या जयजयकारात दुमदुमत होता.