अक्कलकुवा l प्रतिनिधी
आ.आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा येथे जीओ फायबर सेवा मंजूर झाली असून त्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवा शहरातील नागरिकांसाठी हाय स्पीड इटनरनेट , सर्व टीवी चैनल तसेच ओटीटी कन्टेन्ट सेवा च्या लाभ जिओ फाइबर माध्यमातून घेता यावा यासाठी जिओ फायबर सुविधा सुरु करण्यासाठी मंजूरी मिळाली आहे.
आ. आमश्या पाडवी यांनी जाओ फायबरचा सूविधसाठी संबंधितांकडे पाठपुरावा केला होता आणि त्यांनी लागलीच सकारात्मक प्रतिसाद देत मंजूरी दिली आहे. जिओ फायबर अक्कलकुवा शहरात केबल टाकण्याच्या कामाचे उदघाटन आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले लवकरच अक्कलकुवा वासियांना जिओ फायबर च्या लाभ घेता येणार आहे.
कोरोना काळापासून इंटरनेटच्या वापरामध्ये खूपच वाढ झाली आहे. अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी ,शाळा, काॅलेज, शासकिय कार्यालये,सेतू केंद्र,खाजगी व्यवसायीक, सर्वांनाच इंटरनेटची आवश्यकता असते. त्यामुळे प्रत्येकाला इंटरनेट कनेक्शन गरज भासते.
प्रत्येक कुटुंबात सर्वाधिक इंटरनेटचा वापर केला जातो यासाठी जिओने भन्नाट ऑफर आणली आहे. तुमच्यासाठी रिलायन्स जिओ टेलिकॉम कंपनीकडून इंटरनेटसाठी एक ऑफर आणली आहे. तुम्हीही मोफत एक रुपयाही न देता Jio Fiber चा सेटअप बॉक्स बसवून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला कसलेही पैसे देण्याची गरज नाही. जिओ फायबर कनेक्शनसह राउटर विनामूल्य स्थापित केले जाईल. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड 5G हायस्पीड इंटरनेट मिळेल. यामुळे संपूर्ण घरातील सदस्य या हायस्पीड इंटरनेटचा वापर करू शकतात.या सर्व सूविधांचा उपयोग अक्कलकुवा वासियांना करता येईल.आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नातून अक्कलकुवाची नेटवर्कची समस्या हद्दपार होईल.यावेळी माजी सरपंच कान्हा नाईक, युवानेते कुणाल जैन, गोलू चंदेल, सह जियो कंपिनेचे फाइबर विभागाचे जिल्हा मैनेजर सागर पाटिल, कंस्ट्रक्शन मैनेजर जयवंत पाटिल आदीं उपस्थित होते.