नंदुरबार जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रकांत देविदास शिंदे (कोळी) तर जिल्हा सरचिटणीसपदी नासीर इब्राहीम बागवान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे नियुक्तीपत्र जिल्हा परिषद अध्यक्षा ॲड.सिमा वळवी व माजी मंत्री ॲड.पद्माकर वळवी यांच्या हस्ते देण्यात आले.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे, की कॉंग्रेस सेवा दलाबद्दल एकनिष्ठ राहून व वेळोवेळी कॉंग्रेस पक्षाने दिलेल्या कार्यक्रमातील सहभाग आणि कॉंग्रेस पक्षाच्य निवडणुकीत सहकार्य केल्याबद्दल आपली नियुक्ती करण्यात आली आहे. यापुढे आपण कॉंग्रेस सेवा दलाला बळकटी देणार आणि अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा.खा.सोनिया गांधी यांच्या अपेक्षेप्रमाणे व कॉंग्रेस सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलासरावजी औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉंग्रेस पक्षाचे एकनिष्ठेने कर्तव्य बजावणार असेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे. जिल्हा कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हा कार्याध्यक्ष एजाज बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सदर नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मजुर फेडरेशन माजी अध्यक्ष सुरेश आण्णा इंद्रजीत, नरेश चव्हाण, धनराज कोळी, युवराज शिंदे, बहादूर ठाकरे, महेंद्रसिंग राजपूत, लोटन कोळी, कैलास पाटील, महेंद्र शिंदे, युवराज कोळी, सुनिल पाटील, विशाल कोळी, जमिल खाटीक, सलिम बशीर शेख, आरिफ मोमीन, साजिद बागवान आदी उपस्थित होते.