धडगाव l प्रतिनिधी
अमिताभ जोमा वळवी यांनी पत्नीच्या मृत्यूप्रकरणी आरोपीतांवर कारवाई व्हावी यासाठी तहसिलदार कार्यालय धडगांव येथे मूलाबाळांसह बेमुदत आमरण उपोषणास बसले आहेत,
अधिक माहिती अशी की, अमिताभ जोमा वळवी हे हिरीचापाडा (जुगणी) मांडवी ता.धडगांव येथील असून, त्यांनी नंदूरबार जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हाधिकारी बाल विकास अधिकारी यांना संदर्भात निवेदन दिले आहे, निवेदनात नमूद केल्यानुसार दि. 7 फेब्रुवारी 2023 रोजी अमिताभ वळवी यांची पत्नी स्व. अलका अमिताभ वळवी हिने तोरणमाळ सातपायरी घाटात आत्महत्या केली, असल्याचे निवेदनात नमूद केले आहे,
आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारे बालविकास प्रकल्प अधिकारी धडगांव किशोर पगारे तसेच गावातील, रविन हांद्या वळवी, दारासिंग सोन्या वळवी, सरलाबाई रविन वळवी अंगणवाडी मदतनीस, मालतीबाई दारासिंग वळवी, मिनी अंगणवाडी सेविका यांच्या विरोधात म्हसावद पोलिस ठाण्यात भादवी 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
परंतु यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, तसेच दि. 28 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला होता, तेव्हा कार्यवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, परंतु अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही, जोपर्यंत बालविकास प्रकल्प अधिकारी किशोर पगारे यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई होत नाही, तसेच कामाचा मोबदला मिळत नाही, तोपर्यत अमिताभ जोमा वळवी त्यांच्या 5 लहान मुलांसह धडगाव तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत, असे निवेदनात नमूद करण्यात आले असून, न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.