Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवारातर्फे बालवीर चौकात अध्यात्मिक प्रबोधन

team by team
April 30, 2023
in सामाजिक
0
प्रजापिता ब्रह्माकुमारी परिवारातर्फे बालवीर चौकात अध्यात्मिक प्रबोधन
नंदुरबार l  प्रतिनिधी
संपूर्ण विश्वात अत्याचार, भ्रष्टाचार, अनाचार, पापाचार, अशांती पसरली असल्याने मानवाने शिव परमात्म्याचे स्मरण करून सत्कार्य करावे.भौतिक सुखांमागे धावताना अध्यात्मा शिवाय पर्याय नसल्याचे प्रबोधनातून सांगण्यात आले.
माउंटआबू (राजस्थान) येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे आधुनिक पद्धतीने बनविलेल्या  प्रबोधन रथातून नंदुरबार शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणी अध्यात्माचे महत्त्व दाखविण्यात येत आहे. या वाहनातून निद्राधीन कुंभकर्णाचा देखावा लक्षवेधी ठरला.याचबरोबर शिवदर्शनद्वारे सृष्टी वरील प्रकोप आदीबाबत मोठ्या पडद्यावरील चित्रफीत भावस्पर्शी ठरली.
नंदुरबार प्रजापिता ब्रह्मकुमारी केंद्राच्या बीके योगिता दीदी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजचा मनुष्य कुंभकर्णचे प्रतीक असून गाढ निद्रेत आहे.मानवाला जागृत करण्यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय प्रयत्नशील आहे.कार्यक्रमाचे संयोजन ओम शांती परिवार नंदुरबार आणि शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे करण्यात आले.अध्यात्मिक रथाचे दर्शन घेण्यासाठी बालवीर चौक, गवळी वाडा, नवा भोईवाडा,देसाई पुरा, कुंभार गल्ली,शिवाजी रोड,रायसिंग पुरा भागातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रजापिता ब्रम्हाकुमारी मीडिया विंगचे जिल्हा समन्वयक महादू हिरणवाळे, बीके वर्षा दीदी, बीके दिनेश भाई, सुनील भाई, विष्णू भाई,तसेच कर्नाटक येथील शिवभाई, ईश्वरभाई आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान प्रजापिता ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालयातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामीण भागात प्रबोधन रथाचे मार्गक्रमण सुरू असून दि. 30 एप्रिल पर्यंत अध्यात्मिक प्रबोधन करण्यात येणार आहे.अशी माहिती संयोजकांतर्फे देण्यात आली.
बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत असे मिळाले उमेदवारांना मते

Next Post

खुंटामौळीचा पितीपाडा येथे आग लागुन संपुर्ण घर जळून खाक

Next Post
खुंटामौळीचा पितीपाडा येथे आग लागुन संपुर्ण घर जळून खाक

खुंटामौळीचा पितीपाडा येथे आग लागुन संपुर्ण घर जळून खाक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add