नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील खुंटामौळीचा पितीपाडा येथे काल दुपारी अचानक एका घराला आग लागुन संपुर्ण घर जळून खाक झाले.
धडगाव तालुक्यातील खुंटामौळीचा पितीपाडा येथे काल दुपारी सुमारे चार वाजेच्या दरम्यान नरपत इरमा वळवी यांच्या घराला अचानक आग लागली या आगीत नरपत वळवी यांचे संपुर्ण घर जळुन खाक झाले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही मात्र पिडीत संसारोपयोगी साहित्य व काही रोख रक्कम ही जळुन खाक झाली त्यामुळे कुटुंब रस्त्यावर आले आहे. पिडीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्याने कुटुंब वाऱ्यावर आले आहे त्यासाठी शासनाने कुटुंबाला नुकसाना पोटी आर्थिक मदत दयावी अशी मागणी कुटुंबाने केली आहे.