नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूकीपूर्वी चुरशीची वाटणारी निकालाअंती एकतर्फी झाल्याचे दिसून आले. बाजार समितीवर माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा करिष्मा कायम राहिला असून त्यांच्या नेतृत्वात १७ जागांवर शेतकरी विकास पॅनल तर एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.यामुळे राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी परिवर्तन पॅनलला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत दोन उमेदवार विजयी झाले होते.यंदा मात्र भाजपाचा मात्र सुपडा साफ झाल्याचे चित्र या निवडणूकीत दिसून आले.
उमेदवारांना प्राप्त मते
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण
दिनेश विक्रम पाटील (६१५, विजयी), संजय तुकाराम चौधरी (५८१), विजय लिमजी पाटील (६१५, विजयी), भास्कर हिरामण पाटील (५५५).
ग्रामपंचायत मतदार संघ अनुसूचित जाती/जमाती
विक्रम जालमसिंग वळवी (६४९, विजयी), प्रकाश कृष्णराव गावित (५६४).
ग्रामपंचायत मतदार संघ आर्थिक दुर्बल घटक
संजय नरोत्तम पाटील (६३४, विजयी), शामू तुकाराम चौरे (५७८).
सहकारी संस्थांचा मतदार संघ (सर्वसाधारण)
अनिल रघुनाथ गिरासे (३९४, विजयी), रविंद्र भरतसिंग गिरासे (३४०), गोपीचंद गलचंद पवार (३९१, विजयी), उमाकांत पुनाजी चौधरी (३५२), किशोर देविदास पाटील (४०१, विजयी), जितेंद्र नवलराव पाटील (३५१), बालू देविदास पाटील (३५२), महेंद्र सोमजी पाटील (३६०), सुनिल भालचंद्र पाटील (४२३, विजयी), कुशलचंद गणपती बिर्ला (४०८, विजयी), दिपक भागवत मराठे (४०७, विजयी), ठाणसिंग भिका राजपूत (४०३, विजयी),
सहकारी संस्थांचा मतदार संघ (महिला राखीव)
संध्या वकील पाटील (४४५, विजयी), निर्मला नारायण पाटील (३७१), वर्षा शरद पाटील (४३४, विजयी), शकुंतला नाना पाटील (३५३).
सहकारी संस्थांचा मतदार संघ (इतर मागासवर्गीय)
मधुकर टिकाराम पाटील (४५०, विजयी), सुधीर रमण पाटील (३५६)
सहकारी संस्थांचा मतदार संघ (अनुसूचित जमाती)
लकडू रामदास चौरे (४३९, विजयी), प्रभाकर गणेश वळवी (३७३).
व्यापारी मतदार संघ
शिरीष मदनलाल जैन (२६८, विजयी), रविंद्रकुमार रीखबचंद कोठारी (१२३), प्रकाश अवचित माळी (२०३, विजयी), गिरीष नारायण अग्रवाल (१४५).
हमाल मापाडी मतदार संघ
अशोक रावसाहेब आरडे (१०९, विजयी), कोतवाल रतिलाल सोमा (९६), राजेश हरीभाऊ जगताप (११).