नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव शहरातील शिक्षक कॉलनीत कपाटाच्या लॉकरची चावी बनवित घरातील लोकांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत एक लाख रुपये किंमतीचा सोन्याचा नेकलेस चोरुन नेल्याप्रकरणी अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील कुसूम जात्र्या पाडवी यांच्या कपाटाच्या लॉकरची चावी बनवित असतांना कुसूस पाडवी व त्यांची मुलगी या किचनमध्ये असतांना त्यांचे लक्ष नसल्याचा फायदा घेत अनोळखी इसमाने कपाटाच्या लॉकरमधून १ लाख १४०० रुपये किंमतीचा १७ ग्रॅम ९० मि.ली.वजनाचेा सोन्याचा नेकलेस चोरुन नेला. याबाबत कुसूम पाडवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढल तपास पोना.शशिकांत वसईकर करीत आहेत.