नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाला दिलेल्या निवेदनाची दखल घेत प्राथमिक शिक्षण विभाग , जिल्हा परिषद , नंदुरबार अंतर्गत पवित्र प्रणालीमार्फत सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्त करण्यात आलेल्या २१ पैकी १९ शिक्षणसेवकांचा शिक्षण सेवक कालावधी संपुष्टात आणून त्यांना प्राथमिक शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीत सामावून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक शाळांमधील शिक्षक निवड पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी पवित्र ही संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली होती. त्यानुसार सप्टेंबर २०१ ९ मध्ये नंदुरबार जिल्ह्यात एकूण २१ शिक्षणसेवकांना नेमणूक देण्यात आलेली होती . संबंधित २१ शिक्षण सेवकांचा शिक्षणसेवक पदावरील तीन वर्षे कालावधी पूर्ण झाला असून पैकी समाधानकारकरित्या तीन वर्षे शिक्षणसेवक कालावधी पूर्ण करणाऱ्या १ ९ शिक्षणसेवकांना यात नंदुरबार तालुक्यात १ , शहादा तालुक्यात १३ , अक्कलकुवा तालुक्यात ३ व धडगांव तालुक्यात २ प्राथमिक शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणी सामावून घेण्याची प्रक्रिया प्राथमिक शिक्षण विभागाकडून पार पाडण्यात आलेली आहे .
सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, शिक्षण सभापती गणेश पराडके, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी , प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण व निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सुभाष मारनर ,
कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. पी. जाधव व सतिष गावीत तसेच वरिष्ठ सहाय्यक मिलिंद जाधव यांनी कामकाज केले. प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक संजय गावीत, जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत, जिल्हा कार्याध्यक्ष विश्वास देसाई, प्रहार शिक्षक संघटनेचे शहादा तालुकाध्यक्ष तुकाराम अलट यांनी वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. नियमित झालेल्या सर्व शिक्षण सेवकांनी आनंद व्यक्त करत आभार प्रशासनाचे व प्रहार शिक्षक संघटनेचे मानले.