नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे प्रसिद्ध खंडेराव महाराज यात्रा दि. २५ एप्रिल २०२३ रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामस्थ तसेच यावेळी पंचक्रोशीतील मल्हारी भक्त यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
या वेळी जिल्हाचे पालकमंत्री विजयकुमार गावित हे उपस्थित होते. विजय कुमार गावीत यांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण दिसून येत होते. सामाजिक समतेच्या भूमिकेतून काकर्दे गावाचे संरपंच पुंडलिक भापकर यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने गावातील सकल आदिवासी समाज बांधवांना खंडेराव महाराज यांना यात्रेच्या दिवशी मानाचा पहिला नारळ अर्पण करण्याचा मान दिला. यात्रेचे हे मुख्य आकर्षण ठरले, या कृतीतून गावाच्या एकतेचे दर्शन झाले.

प्रसिद्ध खंडेराव महाराज यांच्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, अतिशय उत्साहात हा सोहळा विजय कुमार गावीत साहेब, शांताराम पाटील, महेंद्र पटेल सरपंच पुंडलिक भापकर यांच्या उपस्थितीत पार पडला.
खंडेराव महाराज यात्रेनिमित्त ग्रामस्थांमध्ये प्रसन्नतेचे वातावरण दिसून आले.
सन १९९० साली खंडेराव महाराजाच्या मंदिराचा जिर्णोद्धार लोकवणीतून करण्यात आला . गेल्या दीडशे वर्षापासून श्री खंडेराव महाराज यात्रा भरते, यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे बारा गाड्या तिसरी पिढीतील श्री खंडेराव महाराज यांचे सेवेकरी प्रकाश आनंद माळी यांनी बारा गाडे ओढले. झगा माळी यांनी बारा गाडी ओढण्यास सुरुवात केली त्यानंतर बन्सीलाल झगा माळी तर तीन वर्षापासून प्रकाश माळी हे बारागाडी ओढतात मुख्य , प्रसिद्ध श्री खंडेराव महाराज यात्रे साठी पंचक्रोशीतील तसेच दुरवरच्या ठिकाणाहून मल्हारी मार्तंड भक्त उपस्थित होते. यावेळी शतपावली आकर्षण ठरली.