Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारच्या प्रकल्प अधिकारी राज शिष्टाचाराचे पालन करीत नसल्याची आ. आमश्या पाडवी यांची तक्रार

Mahesh Patil by Mahesh Patil
April 26, 2023
in राजकीय
0
तोरणमाळ येथील पर्यटनकांना तसेच नर्मदा परिक्रमा करणाऱ्या भाविकांना मूलभूत सोयी सुविधेसाठी अतिरिक्त निधी द्या : आ.आमश्या पाडवी 

अक्कलकुवा l प्रतिनिधी
            सामान्य प्रशासन विभागाचा  दि. 27 जुलै 2015 रोजीचा शासन निर्णय अन्वये मा.लोकप्रतिनिधींना शासकीय कार्यक्रमासाठी बोलाविणे व त्यांना सन्मान पुर्वक तसेच सौजन्याची वागणूक देणे बाबत नियमावली लागू केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांना विधान परिषद सदस्य यांना निमंत्रित करतांना त्यांना पूर्व सूचना देणे अभिप्रेत आहे. मात्र नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी मीनल करनवाल हया कार्यक्रम निमंत्रण पत्रिकेत नाव टाकतात परंतु राजशिष्टाचाराचे पालन करीत नाही अशी तक्रार विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांच्याकडे केली आहे.
     आमदार आमश्या पाडवी यांनी विधान परिषदेच्या उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांना प्रत्यक्ष भेटुन दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,शासकीय कार्यक्रमासाठी लोकप्रतिनिधींना बोलाविणे व त्यांना सन्मान पुर्वक तसेच सौजन्याची वागणूक देणे बाबत शासनाने सामान्य प्रशासन विभागाचा  दि. 27 जुलै 2015 रोजीचा शासन निर्णय अन्वये नियमावली लागू केलेली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमांना त्या त्या जिल्ह्यातील विधान परिषद सदस्य यांना निमंत्रित करतांना त्यांना पूर्व सूचना देणे अभिप्रेत आहे.असे असतांना मात्र नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहा.जिल्हाधिकारी  मीनल करनवाल ह्या कार्यक्रमाच्या  निमंत्रण पत्रिकेत आपले नाव टाकतात परंतु राजशिष्टाचाराचे पालन करीत नाहीत ते कार्यक्रमाची कोणतीही पुर्व सुचना अथवा निमंत्रण देत नाहीत आपण  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य आहोत तर राज्यात भारतीय जनता पार्टी व शिंदे गटाचे सरकार आहे.त्यामुळे ते विशिष्ट हेतुने निमंत्रण देत नाहीत.
वास्तव पाहता शासकीय कार्यालय हे कुण्या एका पक्षाचे कार्यालय नसून ते जनतेच्या समस्या सोडविण्याचे कार्यालय असते. जनतेचे  प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी हे कार्यरत असतात त्यामुळे अधिकाऱ्यांनी प्रशासकीय भूमिका बजावतांना प्रामाणिकपणे भुमिका वठवणे अपेक्षित आहे. परंतु प्रकल्प अधिकारी व त्यांचे कार्यालय मात्र सत्ताधारी राजकीय पक्षाची भूमिका या ठिकाणी बजावत असून एका आदिवासी समाजाच्या लोकप्रतिनिधीच्या बाबतीत अपमानकारक वागत असुन लोकप्रतिनिधी यांना असलेल्या विशेष अधिकार व  हक्काचा भंग करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वर कार्यवाही करण्याची मागणी आ. आमश्या पाडवी यांनी केली आहे .सदर बाब आ.आमश्या पाडवी यांनी विधानपरिषदेच्या उप सभापती  ना. डॉ. निलम  गोऱ्हे यांच्या निदर्शनास आणून दिल्या नंतर  सदर बाब ही गंभीर असून यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन उप सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी आ. पाडवी यांना दिले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

दिल्ली येथे झालेल्या जी 20 इव्हेंट च्या क्लायमेट क्लॉक कार्यक्रमात श्रॉफ हायस्कूलचा सहभाग

Next Post

नीट,जेईई पात्रता परीक्षेसाठी आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्या, ट्रायबल फोरमची मागणी

Next Post
नीट,जेईई पात्रता परीक्षेसाठी आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्या, ट्रायबल फोरमची मागणी

नीट,जेईई पात्रता परीक्षेसाठी आदिवासींना मोफत प्रशिक्षण द्या, ट्रायबल फोरमची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

वडाचे झाड गाडीवर कोसळून एकच जागीच मृत्यू

June 4, 2023
तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

तळोदा तालुक्यात मुसळधार पावसात  ३५ बकऱ्यांचा मृत्यू

June 4, 2023
बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

बस व ट्रकचा भीषण अपघात ट्रक चालक ठार तर १५ प्रवाशी जखमी

June 4, 2023
शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

शिक्षणाचे बदलते आयाम’ विषयावरील लेखन स्पर्धेत पुरस्कारप्राप्त स्पर्धकांचा सन्मान

June 4, 2023
शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

शाळेत प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांना हिरा उद्योग समूह घेणार दत्तक : मा.आ.शिरीष चौधरी

June 4, 2023
महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ  सत्यशोधक सभेचे निवेदन

महिला कुस्तीगीरांच्या समर्थनार्थ सत्यशोधक सभेचे निवेदन

June 4, 2023

एकूण वाचक

  • 9,454 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group