Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शासकीय जमिनीवर अतिक्रमण, केळी येथील ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र घोषित

team by team
April 22, 2023
in क्राईम
0
शासकीय जमिनीवर अतिक्रमण, केळी येथील ग्रामपंचायतीचे तीन सदस्य अपात्र घोषित
नंदुरबार । प्रतिनिधी
तालुक्यातील केळी ग्रामपंचायत अंतर्गत चालू पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेले निलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी मनीषा खत्री व नाशिक अप्पर आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज) 3 प्रमाणे विवाद अर्ज दिलवरसिंग नाग्या गावित, मगन वश्या गावित, नरेंद्र गोरजी गावित, विष्णू संपत गावित, रमेश छगन वसावे, प्रवीण ठाकरे गावित (सर्व रा.केळी ता.नवापूर) यांनी प्रतिवादी ग्रामपंचायत सदस्य निलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे यांच्याविरोधात शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करत अर्ज दाखल केला होता.
यावर ग्रामपंचायत विभाग अंतर्गत जिल्हाधिकार्‍यांनी 29 जूलै 2022 रोजी सदस्यांना अपात्र घोषित करत निकाल जाहीर केला होता. त्यानंतर अपात्र घोषित झालेल्या सदस्यांनी नाशिक अपर आयुक्तांकडे अपील अर्ज दाखल केला होता. परंतू 29 मार्च 2023 च्या सुनावणीदरम्यान नंदुरबार जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र ठरविलेल्या सदस्यांचा अपिल अर्ज फेटाळत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 16 निकालाच्या सूचनापत्रानुसार अपील अमान्य करत तिन्ही सदस्यांचे पद अपात्र घोषित करण्यात आले आहे.
शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून निवडणूक लढवून सदस्य प्राप्त केलेल्या केळी ग्रामपंचायतीमधील निलेश पारत्या गावित, जोशदा सवलत गावित, सुंगती जितेंद्र वसावे या सदस्यांचे पद अपात्र घोषित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यातील एक जण उपसरपंच पदावर होते. अपात्र झालेल्या सदस्यांचे पॅनल मोडकळीस आल्याने सरपंच पदही धोक्यात आले आहे. आता प्रशासनाच्या वतीने केळी ग्रामपंचायत अंतर्गत पुन्हा निवडणुका घेऊन अपात्र सदस्यांच्या जागी नवीन सदस्य निवडण्याची प्रक्रिया पुढील शासकीय सूचनेप्रमाणे राबविण्यात येणार आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाचा निर्धार

Next Post

जत्रा शासकीय योजनांची-सर्व सामान्यांच्या विकासाची ;जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात येणार-जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

विकसित भारत २०४७ साठी भविष्य-सज्ज युवा घडविण्यावर भर

May 30, 2026
नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

नगरसेविकांनी प्रभागात महिला सक्षमीकरणाचे कार्य करावे; समन्वयक सरिता कोल्हे

May 30, 2026
नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

नंदुरबार जिल्ह्यात व्यंग-अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत नवदांपत्यांचा गौरव

May 30, 2026
अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

अवैध दारूचा साठा व वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, तब्बल ५६ लाखांचं मुद्देमाल जप्त

May 23, 2026
पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

पेट्रोल-डिझेलचा कोणताही तुटवडा नाही : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 23, 2026
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य प्रियांक कानूनगो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

May 21, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add