नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक-2021 च्या अनुषंगाने जिल्हास्तरावर आचारसंहिता तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नागरीकांनी आचारसंहिता तक्रारीबाबत दूरध्वनी क्रमांक 02564-210007 वर संपर्क साधावा, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता तक्रार निवारण कक्षाचे प्रमुख सुधीर खांदे यांनी कळविले आहे.