नंदुरबार शहरात डेंग्यु, मलेरिया साथीच्या रोगांवर तात्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा नंदुरबार नगर पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष पै.लल्ला मराठे यांनी दिला आहे. तसे निवेदन पालिकेचे मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे यांना देण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सिताराम पावरा तसेच युवानेते ऍड.राऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहराध्यक्ष पै.लल्ला मराठे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, नंदुरबार शहरात वाढत्या मलेरिया, डेंग्यु व साथीच्या रोगांची एकुण परिस्थिती पाहता सद्या या रोगाचे रग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. खाजगी व शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर या साथीच्या आराजाचे रुग्ण आढळून येत आहेत. मागील आठवड्यात यावल येथे एका युवकाचा तर धुळे येथे एका बालकाचा डेंग्युच्या आजाराने मृत्यू झाला. नंदुरबार शहरातही अशा जीवघेण्या आजारामुळे कोणाच्या मृत्युची वाट तर नंदुरबार नगरपालिका पहात नाही ना, असे नागरीकांना वाटू लागले आहे. तरी आपल्या नंदुरबार नगरपालिकातर्फे हा साथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा राष्ट्रवादी शहर युवक कॉंग्रेसतर्फे नंदुरबार पालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नंदुरबार शहर कार्याध्यक्ष कालु पैलवान, संघटक जितु ठाकरे उपाध्यक्ष लाला बागवान, संजय मराठे आदी उपस्थित होते.