Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात दोघे ठार

team by team
April 20, 2023
in क्राईम
0
बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; एक जखमी
नंदुरबार l प्रतिनिधी
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अज्ञात ट्रक चालकाने दुचाकीला मागून धडक दिल्याने १५ वर्षीय युवक ठार तर मोलगी -अक्कलकुवा रस्त्यावर आमलाबारी गावाच्या पुढे वळणावर आयशरने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात २५ वर्षीय तरुण ठार तर दोघे जखमी झाले आहेत.
अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावर अज्ञात ट्रकवरील चालकाने त्यांच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने हयगयीने तसेच अविचाराने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन समोर चालत असलेली दुचाकी (क्र.जीजे.२२ क्यू ११४३)हिस मागून धडक दिल्याने घडलेल्या अपघातात संदीप कुशन तडवी(वय १५,रा.कोराई,ता.अक्कलकुवा) हा गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.तसेच त्याचे मित्र धिरज कनखाडी(ता.सागबारा,जि.नर्मदा) व राजेश विजय तडी(रा.पानखला,ता.सागबारा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. ट्रकचालक अपघात घडल्यानंतर घटनास्थळावरुन पसार झाला.
याबाबत कुशन गुलाब तडवी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रक चालकाविरोधात भांदवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ. उल्हास ठिंगळे करत आहेत. तर दुसऱ्या घटनेत आयशरने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले
आहेत.
अज्ञात आयशर चालकाने मोलगी-अक्कलकुवा रस्त्यावर आमलाबारी गावापुढे भरधाव वेगाने वाहन चालविल्याने रस्त्यावर पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला.या अपघातात जितेंद्र खेत्या वळवी(वय २५,रा.जांगठी,ता.अक्कलकुवा) हा तरुण ठार झाला.तर शिलाबाई मंगेश वसावे व नरेंद्र जयसिंग वळवी (रा.जांगठी,ता.अक्कलकुवा) हे दोघे जखमी झाले आहेत.तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे.आयशरचालक मात्र अपघात घडल्यानंतर घटना स्थळावरुन पसार झाला.याबाबत खेत्या खुमा वळवी यांच्या फिर्यादीवरुन आयशर चालकाविरोधात भादंवि कलम ३०४ (अ),२७९,३३७,३३८,४२७सह मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४,१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ.संजय ठाकुर करत आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

शेतकरी सहकारी संघावर शिवसेनेच्या शिंदे गटाच्या झेंडा

Next Post

महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Next Post
महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add