नंदुरबार l प्रतिनिधी
येथील शेतकरी सहकारी संघावर शिवसेनेच्या शिंदे गटाने झेंडा फडकवलेला आहे.गेल्या ४० वर्षांपासून स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी गटाची बिनविरोधाची परंपरा यंदाही कायम राहिलेली आहे.
नंदुरबार येथील शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक सहकार विभागाच्या सहाय्यक उपनिबंधकांकडून जाहीर करण्यात आली होती. काल बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवस होता. शेवटच्या दिवशी १३ पैकी १३ जागांवर निवड रघुवंशी गटाच्या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्याने निवडणूक बिनविरोध झाली. बिनविरोध झालेल्या सदस्यांच्या माजी आमदार तथा शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सत्कार करण्यात आला.
बी.के पाटील, अरुण हजारे, प्रभाकर पाटील,लोटन पाटील, भारत राजपूत, पंडित पाटील, संतोष पाटील,विलास पाटील, उद्धव पाटील,गोकुळ नागरे, नाठ्या वळवी,मालतीबाई देसले, सेजल पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संघाचा कार्यकर्तृत्वाच्या कामांची पावती;माजी आ. चंद्रकांत रघुवंशी
शेतकरी सहकारी संघाच्या संचालक मंडळाच्या कार्याची जनमताची पावती म्हणून यंदाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. गेल्या ४० वर्षांपासून विकासाच्या दिशेने घोडदौड करीत आहे.लोकनेते,माजी आ.स्व जी.टी पाटील व माजी आ.बटेसिंगभैय्या रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघाने मुहूर्तमेढ रोवली. कोणालाही संधी न देता एकतर्फी संचालक मंडळ बिनविरोध झाली. एकीकडे नंदुरबार तालुक्यात चुरशीच्या निवडणुकीला होत असतांना शेतकरी सहकारी संघ बिनविरोध होणं कार्यकर्तृत्वाच्या कामांची पावती आहे. प्रामाणिकपणे काम केल्यास विरोधकांना सूचक व अनुमोदक मिळत नाही हे चित्र यंदाच्या निवडणुकीतून दिसून आले आहे.









