नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्हात अटकेत असलेल्या न्यायबंदी छोटयाशा बोळीने पळुन संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन कायदेशीर रखवालीतुन पळुन गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ६.५० ते ७ वाजेच्या दरम्यान जिल्हा कारागृह नंदुरबार येथील सर्कल क्र १ ते ८ मधील कारागृहाच्या आतील साचलेला कचरा बाहेर टाकण्यासाठी ६ बंदिना होमगार्ड रविंद्र चव्हाण यांच्यासोबत पाठविण्यात आले होते त्यावेळी तळोदा पोलीस ठाण्यातील भादंवि क ३०२ या गुन्हयात न्यायधीन बंदी क्र ५४/२३ उदेसिंग कुशा वसावे रा- तळोदा हा जिल्हा कारागृह नंदुरबार येथील महिला विभागाच्या मागील बाजुने पळाला व तटाच्या बाजुने मेनगेट जवळील मुलाखत कक्षाच्या बाजुला असलेल्या छोटयाशा बोळीने पळुन संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन कायदेशीर रखवालीतुन पळुन गेला.
या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी तुरुंग अधिकारी संदिप एकनाथ चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नंदूरबार तालुका पोलीस ठाण्यात उदेसिंग कुशा वसावे रा- तळोदा याच्या विरुध्द भादवी कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोह.सुरेश वसावे करीत आहेत.








