Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर; किरण बिडकर

team by team
April 18, 2023
in क्राईम
0
नंदुरबार उप प्रादेशिक परिवहनाच्या वायुवेग पथकाचे उत्पन्न 4 कोटींवर; किरण बिडकर

नंदुरबार l प्रतिनिधी

वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत मोटार वाहन कायद्यातील नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून वायुवेग पथकाद्वारे 4 कोटी 4 लक्ष 63 हजार रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

वायुवेग पथकामार्फत धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे, विना परवाना वाहन चालविणे, ओव्हरलोड वाहतूक, हेल्मेटचा वापर न करणे इत्यादी विविध गुन्हे करणाऱ्या 5 हजार 683 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून उद्दीष्टाच्या तुलनेत ही रक्‍कम 192 टक्के आहे. नवीन वाहन नोंदणी, एक रकमी कर, मालवाहू वाहनांचा वाहन कर, परवाना शुल्क,

अनुज्ञप्ती शुल्क इत्यांदीच्या माध्यमातून 56.17 कोटी जमा झाली आहे. तर सीमा तपासणी नाका, नवापूर येथे आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या 49 हजार 298 वाहनांकडून 14 कोटी 38 लक्ष रूपये तसेच सीमा तपासणी नाका, गवाली, ता. अक्कलकुवा येथे 23 हजार 151 वाहनांकडून 5 कोटी 40 लक्ष रूपये वाहन कर व दंड या स्वरूपात वसूल करण्यात आले आहे.

वर्ष 2022-23 या आर्थिक वर्षात एकूण 14 हजार 837 नवीन वाहनांची नोंदणी करण्यात आली, यात 11 हजार 604 दुचाकी, 1 हजार 999 मोटार कार, 373 मालवाहक वाहने, 1 हजार 369 ट्रॅक्टर्स, 153 ट्रेलर्स आणि 144 जेसीबी क्रेन,अॅम्यूलन्स इत्यादी अन्य वाहनांचा समावेश आहे. मागील वर्षीच्या तुलनेत नवीन नोंदणीमध्ये 2 हजार 358 वाहनांची वाढ झाली आहे.

ही महसूल वसूली करण्यासाठी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव, तसेच कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक तसेच कार्यालयीन कर्मचारी, पोलीस विभाग यांनी विशेष प्रयत्न केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारितेच्या कार्याला साथ द्यावी- जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर

Next Post

रघुवंशी परिवाराचे सामाजिक दातृत्वातून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पालिकेला २ शववाहिनी सुपूर्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add