नंदुरबार l प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा नंदुरबारतर्फे येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह हरिहरेश्वर मंदिर येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ५८ शिक्षकांनी महापुरुषांना मानवंदना दिली.
रक्तदान शिबिरास आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास खासदार डॉ.हिना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, गजानन डांगे, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक परिषदेचे राज्यकोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे व त्यांच्या धर्मपत्नी सविता काळे व जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी शिबिरात प्रथम रक्तदान केले.
आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित साहेब यांनी रक्तदानाचे महत्व व जिल्ह्यातील परिस्थिती व संघटनेने हाती घेतलेलं कार्य कौतुकास पात्र आहे. शिक्षक ज्ञानदानाबरोबर रक्तदान देखील करून समाजाप्रती आपली असलेली बांधिलकी जपतात असे गौरव उदगार काढले.
डॉ.हिना गावित यांनी रक्तदानाचे महत्त्व व फायदे सांगून नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात अद्यावत ब्लड कंपोनंट सेपरेशन यंत्रणा उभारण्यात आली आहे, या यंत्रणेचा ही प्रभावीपणे वापर होईल असे सांगितले. यावेळी शिक्षक परिषद हे मागील अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन करतात. शिक्षक परिषदेचे कार्य वाखानन्याजोगे आहे. या शब्दात त्यांनी शिक्षक परिषदेचे कौतुक केले.
डॉ.सुप्रिया गावित यांनी रक्तदानाविषयी असलेल्या अंधश्रद्धा मोडीत काढून शिक्षक परिषद जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करते. यामुळे लोकांमधील रक्तदानाविषयी असलेली भीती नक्कीच दूर होईल. व नंदुरबार सारख्या आदिवासी भागात सिकलसेल, ऍनिमिया, थॅलेसेमिया अशा आजारांपासून हा जिल्हा मुक्त होईल.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनीही या महारक्तदान शिबिरास भेट देऊन रक्तदात्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. यावेळी रक्तदान शिबिरात रवींद्र पाटील, दत्ता चव्हाण, अरुण भामरे, भारती आव्हाड, सरिता काळे, दिपमाला बागल, शितल पाटील आदी ५८ शिक्षकांनी रक्तदान केले, शिबिरास विविध संघटनेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिकांनी भेट दिली. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजीत मोरे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित आदींचा समावेश होता.
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी जिल्हा कार्यवाह किरण घरटे, शरद घुगे, नंदुरबार तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, उपाध्यक्ष राजेंद्र चौधर, प्रसिद्धी प्रमुख बालाजी लालोंडे, दीपक खैरनार,अमोल पाटील, भिकन पिंजारी, गणेश अचिंतलवार, जगदीश पाटील, प्रकाश बोरसे, दिनेश मोरे,आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन विभागीय उपाध्यक्ष राकेश आव्हाड यांनी केले तर आभार विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल यांनी मानले.