नंदूरबार l प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यातील वणी येथील सप्तश्रृंगी गडावर जाऊन आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आई सप्तश्रृंगी प्रतिष्ठानचे सल्लागार भरत गावित व जि.प.च्या महिला बालकल्याण सभापती संगीता गावित यांनी सप्तश्रृंगी मातेचे दर्शन घेत विधिवत पूजा केली.

यावेळी सप्तश्रृंगी देवी निवासिनी ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी भरत गावित व संगीता गावित यांचा आई सप्तश्रृंगी मातेची प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी नवापुर येथील आई सप्तश्रृंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमंत जाधव, उपाध्यक्ष रज्जू अग्रवाल, सचिव शैलेश सैन, हेमंत शर्मा उपस्थित होते.








