नंदूरबार l प्रतिनिधी
सामाजिक कार्यक्रमाच्या निमित्ताने चितळे उद्योग समुहाचे गिरीश चितळे शहादा येथे आले होते.जलसाक्षरता समितीचे कार्यकत्यांना आपल्या टी शर्ट मध्ये बघुन सर्वांना त्यांच्या विषयी उत्सुकता होतीच.या प्रसंगी जलसाक्षरता समिती अक्राणी च्या युवकांच्या सातपुड्यातील जल संधारणाचे व शाश्वत विकासाचे कार्य यांची माहिती जलदुत भरत पावरा व प्रा अनिल शिंदे यांनी करुन दिली. गिरीश चितळे यांनी बांबु कारिगरांना बांबु लागवड वाढविणे व त्या पासून शाश्वत रोजगार निर्मितीसाठी बांबु पासुन बनविण्या प्रोत्साहन देणार्या व जलसंवर्धनाच कार्य करणार्या जलसाक्षरता समितीचा कार्या विषयी गौरवोदगार काढले आणि पुढील भेटीत कुकलटपाडा व निमझरीपाडा येथे भेट देण्याचे आश्वासन दिले.
आम्हाला स्वागतामध्ये मिळालेल्या बांबु पासुन बनविलेल्या वाल हंग भेट वस्तुची निर्मिती ही जलसाक्षरता समितीच्या संकल्पनेचा भाग आहे हे बघितल्यावर सदस्यांशी भेटण्याची उत्सुकता होती त्यांना भेटुन आनंद वाटला असे कोल्हापुरचे जायंटस फेडरेशनचे माजी अध्यक्ष डाॅ राजकुमार पोळ यांनी सांगितले.
जायंटसचे विश्व उपाध्यक्ष विजय बाबु चौधरी यांनी समितीचे अभिनंदन केले तसेच जायंटस चे आंतरराष्ट्रीय कार्यालयीन सेक्रेटरी वीरेंद्र अय्यर यांनी पाणी टंचाई दुर करण्यासाठी विशिष्ट ठिकाणी जलसंधारणाचे कार्य करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जलसाक्षरता समितीचे प्रवर्तक प्रा डाॅ एच एम पाटील यांना केले.








