Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्युज : अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीतील निधीच्या अनियमितते बाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे सिओचे आदेश

team by team
April 7, 2023
in क्राईम
0
ब्रेकिंग न्यूज : बॅटरीचा स्फोट झाल्याने ट्रक पेटून चालक जागीच ठार

नंदुरबार l प्रतिनिधी

 

 

 

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीचे सन २०१६-१७ ते सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या लेखा परीक्षणात तब्बल ३ कोटी ३४ लाख ७९ हजार ४९३ रुपयांची अनियमितता झाल्याचे सदरच्या आदेशात नमुद करीत चौकशी अहवालानुसार त्या-त्या काळातील संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

 

 

अक्कलकुवा ग्रुप ग्रामपंचायतीत सन २०१६ ते २०१९ या कालावधीतील लेखा परीक्षणात झालेल्या विकासकामात अनियमितता झाल्याचे दिसून आले आहे. याबाबत न्यायालयात देखील रिपिटीशन दाखल झाले आहे. दरम्यान, चौकशीअंती त्या-त्या कालावधीतील ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच यास जबाबदार असल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत एकूण ३ कोटी ३४ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या निधीची अनियमितता झाली आहे.

 

 

 

सन २०१६-१७, सन २०१७-१८, सन २०१९-२० अन्वये लेखा परीक्षणामध्ये आक्षेपाधिन ठेवलेली रक्कम ३ कोटी ३४ लाख ७९ हजार इतकी आहे. सदर रक्कम अनियमितता घोषीत करुन त्यास लेखा परीक्षणात नमूद केल्याप्रमाणे त्या-त्या कालावधीतील सरपंच, प्रशासक, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकार जबाबदार आहे. त्याचप्रमाणे सन २०१६-१७, सन २०१७-१८ व सन २०१९-२० अन्वये लेखा परीक्षणामध्ये वसूल पात्र रक्कम १० लाख ८७ हजार ७७५ इतकी आहे. यास देखील त्या कालावधीतील ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकारी जबाबदार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

 

 

त्यानुसार जे.एस.बोराळे (तत्कालिन प्रशासक तथा कृषी अधिकारी, अक्कलकुवा पं.स.), एम.आर.देव (तत्कालिन प्रशासक तथा तत्कालिन विस्तार अधिकारी), व्ही.बी.जाधव (तत्कालिन ग्रामाविकास अधिकारी), उषाबाई बोरा (तत्कालिन सरपंच), आनंदा पाडवी (तत्कालिन ग्रामविकास अधिकारी), ५ टक्के पेसा अंबंधनिधी अंतर्गत अक्कलकुवा, मिठ्याफळी व मक्राणीफळी ग्रामकोष समितीचे संबंधित ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी, समिती अध्यक्ष व सदस्य.यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी अक्कलकुवा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

सुंदर माझा दवाखाना” या उपक्रमाचा जि. प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते शुभारंभ

Next Post

थुवानी येथे गरिब कुटुंबाचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

Next Post
थुवानी येथे गरिब कुटुंबाचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

थुवानी येथे गरिब कुटुंबाचे घर जळून खाक लाखोंचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add