नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुपोषण आहे, हे कुपोषण कमी करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत, त्यातील एक संस्था म्हणजे रेच ईच् चाइल्ड आहे. या संस्थेच्या वतीने अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा या गावात जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
या वेळी जिल्ह्यात कुपोषण, बालमृत्यू आणि आरोग्याच्या अशा समस्या दूर करण्यासाठी जिल्हा परिषद अहोरात्र मेहनत करत आहे. यासाठी अनेक संस्थेची मदत देखील चांगली मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याच्या समस्या लवकरच दूर करण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद आणि संस्था करतील असा विश्वास यावेळेस जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी सांगितलं,
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते लहान मुलांना आरोग्याचे किट वाटप करण्यात आली, यात ब्लॅंकेट, कानपट्टी, आणि अनेक वस्तू या कार्यक्रमात लहान मुलांना देण्यात आले.
या कार्यक्रमाला सरपंच रंजना राऊत, आरोग्य अधिकारी श्री.बडगुजर , उपसरपंच चंद्रसिंग दादा, अशोक राऊत, रेच ईच् चाइल्ड संस्थाचे प्रतिनिधी आणि पंचक्रोशीतील नागरिक लहान बालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









