Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषि विभागाचे पथके टाकणार बोगस बियाण्यांवर धाडी, तक्रार असल्यास साधा संपर्क

team by team
April 6, 2023
in राज्य
0
कृषि विभागाचे पथके टाकणार बोगस बियाण्यांवर धाडी, तक्रार असल्यास साधा संपर्क
नंदुरबार l प्रतिनिधी
 खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्ह्यात  मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हा तसेच तालुकास्तरावर भरारी पथक गठित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर यांनी  एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
हे भरारी पथक 1 एप्रिल,2023 पासून स्थापन केले असून जिल्हास्तरावर नियंत्रक तथा परवाना अधिकारी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली  कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद हे भरारी पथकाचे प्रमुख असतील. पथकात जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हे सदस्य सचिव म्हणून तर उप विभागीय कृषि अधिकारी, नंदुरबार व शहादा, मोहिम अधिकारी व निरीक्षक वजनेमापे हे जिल्हास्तरीय सदस्य असतील.
तालुकास्तरावर सहा पथक स्थापन केले असून तालुका कृषि अधिकारी याच्या अध्यक्षतेखाली भरारी पथके कार्यरत करण्यात आली असून कृषि अधिकारी, पंचायत समिती, तालुकास्तरीय निरीक्षक वजनेमापे, तसेच संबंधित कार्यक्षेत्राचे मंडळ कृषि अधिकारी हे सदस्‍य असतील.
तालुकास्तरावरील भरारी पथक प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे आहेत. नंदुरबार एस.ए.शेळके (9404110878), नवापूर बी.जे.गावीत (7588303692), अक्कलकुवा एन.ए.गढरी (9421512272), शहादा के.ई.हडपे (8055824864) तळोदा एन.आर.महाले (9420060528) तर अक्राणीसाठी आर.एस.महाले (9404970335 ) असे आहेत. या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनाधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाण्याची खरेदी करावी, बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये. जादा दराने कृषि निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत तक्रार जिल्हास्तरीय किंवा तालुकास्तरीय पथकाकडे करावी. तसेच कृषि निविष्ठाविषयी असलेल्या अडचणी, तक्रारी व मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18001801551/ 18002334000 वर संपर्क साधावा.
कृषि निविष्ठेच्या तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
खरीप हंगाम 2023-2024 साठी जिल्हास्तरावर निविष्ठा, बियाणे, खते व किटकनाशके या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी  तक्रार निवारण नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या  नियंत्रण कक्षासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी जे.एस.बोराळे भ्रमणध्वनी क्रमांक (9359559680) , जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक एन.डी.पाडवी (9423959715) तर टिपणी सहायक डी. एस. बाविस्कर 9623810798 असा आहे. तसेच संपर्कासाठी ईमेल adozp@gmail.com, व dsaondb@gmail.com असा आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि निविष्ठेबाबत तक्रार असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. भागेश्वर यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आ.चंद्रकांत रघुवंशी यांची त्या पार्टीची सर्वत्र चर्चा……

Next Post

ते सांभाळतात अंथरुणाला खिळून असलेल्या पोलीसांचे कुटूंब !

Next Post
ते सांभाळतात अंथरुणाला खिळून असलेल्या पोलीसांचे कुटूंब !

ते सांभाळतात अंथरुणाला खिळून असलेल्या पोलीसांचे कुटूंब !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add