Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी जिल्ह्यात 1 लाख 12 हजार शेतकरी लाभार्थी

team by team
April 6, 2023
in राज्य
0
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीसाठी जिल्ह्यात 1 लाख 12 हजार शेतकरी लाभार्थी

नंदुरबार l प्रतिनिधी

अल्प व अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा विकास करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने, राज्य शासनाच्या समन्वयाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजना सुरु केली आहे.
या योजनेत जिल्ह्यात 1 लाख 12 हजार शेतकरी लाभार्थ्यांनी आपली नोंदणी केली आहे.

या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबियांना 2 हजार प्रति हप्ता याप्रमाणे तीन हप्त्यांत एकूण 6 हजार प्रति वर्ष लाभ अनुज्ञेय आहे.  नुकतेच  देशभरातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंच्या तेराव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एकूण 1 लाख 30 हजार 366 लाभार्थीची यादी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी संकेतस्थळावर  प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यात नंदुरबार 27 हजार 115, नवापूर 27 हजार 810, शहादा 31 हजार 731, अक्राणी 12 हजार 264, अक्कलकुवा 16 हजार 880 तर तळोदा 14 हजार 566 असे आहेत.

आज अखेर नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 12 हजार 419 शेतकऱ्यांनी किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी केली असून यापैकी जिल्ह्यातील  91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासीपूर्ण केली आहे. यात नंदुरबार 18 हजार 269, नवापूर 19 हजार 779,शहादा 22 हजार 843,अक्राणी 8 हजार 308,अक्कलकुवा 12 हजार 825, तसेच तळोदा तालुक्यातील 9 हजार 664  असे 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासी पूर्ण केली असून जिल्ह्यात ई-केवासी पूर्ण करण्याचे प्रमाण 82 टक्के आहे. या योजनेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचाविण्यास मदत झाली असून ऐन खरीप हंगामात या रक्कमेचा शेतकऱ्यांना उपयोग होणार आहे.

पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यापूर्वी ई- केवायसी प्रमाणिकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवासी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले असून, लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in  या संकेतस्थळावर ओटीपी पद्धतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक पध्दतीने ई केवायसी प्रमाणीकरण करु शकतील. तसेच आता पीएम किंसान योजनेसाठी लाभार्थ्यांनी स्वत:ची नोंदणी मोबाईल ॲपद्वारे अधिक सहज आणि सोपी करण्यात आली आहे.

तरी, सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करावे तसेच ज्या लाभार्थीची पीएम किसान पोर्टलवरील माहिती चुकीची असल्यामुळे लाभाची रक्कम प्राप्त झालेली नाही, अशा लाभार्थीनी योजनेचा लाभ अखंडीतपणे मिळावा यासाठी आपले आधारकार्ड, बँक खाते पुस्तिकेची सुस्पष्ट प्रत व जमिनीच्या कागदपत्रांसह (7/12 इत्यादी) नजीकच्या तलाठी, ग्रामसेवक किंवा कृषीसेवक तसेच नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये यांच्याशी संपर्क साधून माहिती अद्यावत करून घ्यावे असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

दृष्टिक्षेपात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

 किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एकूण 1 लाख 30 हजार 366 लाभार्थी

नंदुरबार 27 हजार 115, नवापूर 27 हजार 810, शहादा 31 हजार 731, अक्राणी 12 हजार 264, अक्कलकुवा 16 हजार 880 तर तळोदा 14 हजार 566

91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासीपूर्ण केले आहे.

नंदुरबार 18 हजार 269, नवापूर 19 हजार 779,शहादा 22 हजार 843,अक्राणी 8 हजार 308,अक्कलकुवा 12 हजार 825, तसेच तळोदा तालुक्यातील 9 हजार 664  असे 91 हजार 688 शेतकऱ्यांनी ई-केवासी पूर्ण केली.

केवासी पूर्ण करण्याचे प्रमाण 82 टक्के आहे.

योजनेसाठी https://pmkisan.gov.in  या संकेतस्थळावर ओटीपी पद्धतीने किंवा ग्राहक सेवा केंद्र (सीएसएस) केंद्रावर बायोमेट्रिक  पद्धतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करु शकतील.

बातमी शेअर करा
Previous Post

रामदूत भक्त परिवारातर्फे आज दुधाळे आणि नंदुरबारात सुंदरकांड

Next Post

नंदूरबार येथे भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने कार्यालयात करण्यात आले ध्वजारोहण

Next Post
नंदूरबार येथे भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने कार्यालयात करण्यात आले ध्वजारोहण

नंदूरबार येथे भाजपाच्या स्थापना दिनानिमित्ताने कार्यालयात करण्यात आले ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add