Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलत,टॅक्सी परवाना धारकांवर आर्थिक संकट,जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Mahesh Patil by Mahesh Patil
April 3, 2023
in Uncategorized
0
महिलांना बसमध्ये ५० टक्के सवलत,टॅक्सी परवाना धारकांवर आर्थिक संकट,जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्ह्यातील टॅक्सी मालक व चालक यांनी महिलांना बस मध्ये ५० टक्के तिकीट भाड्यात सवलत दिल्यामुळे टॅक्सी परवानाधारकांना आर्थिक संकट ओढवले गेले असल्यामुळे टॅक्सी मालक -चालक संघटनेतर्फे जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. टॅक्सी मालक-चालक संघटना नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा ,तळोदा या चारही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांना निवेदन देण्यात आले.
 यावेळी नंदुरबार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी, उपाध्यक्ष पांडुरंग सोनार, सचिव बापू माळी, शहादा संघटनेचे अध्यक्ष अरुण चौधरी, तळोदा संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे, अक्कलकुवा संघटनेचे अध्यक्ष मुस्ताक बलोच यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
     टॅक्सी चालक-मालक संघटनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की आम्ही १९९० पासून परवानाधारक टॅक्सी  धुळे ,शहादा, अक्कलकुवा, तळोदा यासह विविध ठिकाणी प्रवासी सेवा करीत आहोत मात्र शासनाने महिलांना बस मध्ये ५० टक्के तिकीट भाड्यात सवलत दिल्यामुळे टॅक्सी परवाना धारकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शासन नियमाप्रमाणे आम्ही पर्यावरण कर ,व्यवसाय कर, दरवर्षी गाड्यांची पासिंग नियमांचे पालन करून प्रवासी सेवा देत आहोत. परंतु वर्तमान सरकारने महिलांना ५० टक्के भाड्यात सवलत जाहीर केल्यामुळे आमच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे.
जिल्ह्यात साधारण परवानाधारक ११० च्या वरती टॅक्सी आहेत .यासोबत अन्य खाजगी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी देखील आहेत यामुळे चार हजाराच्या वरती लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. महिलांना सवलत तसेच यापूर्वी ७५ वर्षावरील प्रवासीना देखील सवलत दिल्यामुळे ते देखील आमच्या वाहनांवर प्रवास करीत नाहीत. आमच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून गेल्या ३० वर्षांपासून सतत चालणाऱ्या वाहतूक व्यवसाय बंद पडेल की काय अशी भीती वाटते. याच्या परिणाम आमच्या दैनंदिन जनजीवनावर होत आहे. मुलांच्या शिक्षणासह आरोग्य व दैनंदिन खर्च तसेच कर्जाने घेतलेल्या गाड्यांचे मासिक हप्ते भरण्यावर परिणाम होत आहे कर्जबाजारी होण्याची भीती नाकारता येत नाही .कौटुंबिक समस्या उभ्या राहून आर्थिक संकटामुळे कुटुंब उद्ध्वस्त होईल की काय अशी भीती आम्हास वाटत आहे.
महाराष्ट्र शासनाने टॅक्सी चालकांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केले आहे. त्याच्या फायदा परवाना टॅक्सी चालक-मालक यांना महामंडळाच्या फायदा होईल याबाबत आपण आपल्या पदाचा उपयोग करून आम्हास न्याय द्यावा असे या निवेदनात म्हटले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

बालवाडीत शिकणारी माहेरुनचा पहिला रोजा

Next Post

धुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अटक, जिल्ह्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड, 63 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Next Post
विद्युत तारेची चोरी करणाऱ्यास नवापूर पोलीसांनी केली अटक

धुळे जिल्ह्यातील अट्टल गुन्हेगारास अटक, जिल्ह्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातील 14 गुन्हे उघड, 63 हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

नवापूर एमआयडीसीत उच्च क्षमतेच्या विज जोडणीला मान्यता

July 1, 2025
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

June 30, 2025
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

June 30, 2025
शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

June 30, 2025
तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

तळोद्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

June 28, 2025
खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

खा. सुनिल तटकरे यांच्या दौऱ्यानिमित्त नवापूर येथे राष्ट्रवादीची बैठक

June 28, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group