Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार तालुक्यातील पाच जि.प.गटाच्यां पोटनिवडणूकीत एक लाख मतदार बजावणार हक्क

team by team
June 29, 2021
in राजकीय
0

नंदुरबार |  प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितींमधील रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आला आहे. सदर पोटनिवडणूकीत कोरोना नियमांचे पालन करुन निवडणूका पार पाडण्याचे नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, नंदुरबार तालुक्यातील पाच गटांसाठी पोटनिवडणूक होणार असून यात १ लाख १ हजार ७४२ मतदार हक्क बजावणार आहेत. तर पाच गणांसाठी ३७ हजार ९०७ मतदार हक्क बजावणार असल्याची माहिती नंदुरबार तालुका निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील ११ गट व १४ गणातील सदस्यांचे सदस्यत्व आरक्षणाच्या मुद्यावर रद्द करण्यात आले आहेत. यामुळे रिक्त असणार्‍या गट व गणातील जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. नंदुरबार तालुक्यातील रिक्त असणार्‍या पाच गट व गण तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी काल नंदुरबार तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका निवडणूक निर्णय अधिकारी महेश सुधळकर म्हणाले, सोमवार दि.१९ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेदरम्यान मतदान होणार आहे. तर २० जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी २९ जून ते ५ जुलै असणार आहे. दि.६ जुलै रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार आहे व त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दि.९ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्र स्विकार करण्याबाबत किंवा नामंजूर करण्याबाबत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध न्यायाधिशांकडे अपील करण्याची शेवटची तारीख ९ जुलै असणार आहे. नामांकन मागे घेण्याची तारीख १२ जुलै तर अपील आहे तेथे नामांकन मागे घेण्याची तारीख १४ जुलै असणार आहे. दि.१४ रोजी प्रत्यक्ष निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची यादी प्रसिद्ध होणार असून निशाणी वाटप होणार आहे.
दि.१९ रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी होणार असल्याचे सुधळकर यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार तालुक्यात पाच गट तर पाच गणांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. यात कोळदे गटासाठी एकूण १७ हजार ८२ मतदार हक्क बजावणार आहे. तसेच खोंडामळी गटासाठी २४ हजार ११६, कोपर्ली गटासाठी २० हजार ४०६, रनाळा गटासाठी २० हजार १२० तर मांडळ गटासाठी १० हजार १८ असे एकूण पाच गटांसाठी १ लाख १ हजार ७४२ मतदार आहेत. तर पंचायत समितीच्या पाच गणांंमध्ये गुजरभवाली गणासाठी ११ हजार १९३, पातोंडा गणासाठी ९ हजार ९८७, नांदर्खे गणासाठी ८ हजार ४८० तर गुजरजांभोली गणासाठी ४ हजार २४७ मतदार आहेत. तर होळतर्फे हवेली या गणाचा निर्वाचन विभाग गट क्र.३८ कोळदे यामध्ये समाविष्ट आहे.दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करुन पोटनिवडणूक पार पडणार आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी पथकांची नियुक्ती करण्यात येणार असून निरंक वातावरणात पोटनिवडणूक पार पडण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सुधळकर यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

म्हसावद येथील शेतकर्‍यांनी पपई वर फिरवला रोटो

Next Post

हट्टी खुर्द गावातून सव्वा चार लाखांचा अफू जप्त

Next Post

हट्टी खुर्द गावातून सव्वा चार लाखांचा अफू जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add